दिल्लीच्या विशेष जलदगती न्यायालयाने कल्याण पुरी मतदान केंद्रावर जाऊन निवडणुक प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एक महत्वाचा निर्णय देत, आम आदमी पार्टीचे आमदार मनोज कुमार यांना तीन महिने तरूंगवासाची शिक्षा सुनावली. याबरोबर त्यांना दहा हजार रूपयांचा दंड देखील ठोठवण्यात आला. तर या निर्णयास आव्हान देण्यासाठी त्यांना जामीन देखील मंजूर झाला आहे. निवडणूक प्रक्रियेत अडसर निर्माण केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

आमदार मनोज कुमार यांच्यावर २०१३ मधील विधानसभा निवडणुकांदरम्यान कल्याण पुरी मतदान केंद्रावर जाऊन निवडणुक प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. मनोज कुमार हे इस्ट दिल्लीतील कोंडली मतदार संघाचे आमदार आहेत.