शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलना दरम्यान मंगळवारी दिल्लीच्या डीडीयू मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मागच्या दोन महिन्यापासून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. सीमा भागातील बॅरिकेडस तोडून शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश केला. दिल्लीच्या अनेक भागात पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमकी झाल्या.

दिल्ली-हरयाणा सिंघू सीमेवर एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोनीपतच्या मादीना गावातील हा शेतकरी आहे. ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे आंदोलन स्थळी त्याचे निधन झाले. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुणी तलवारी उपसल्या तर कुणी बसगाड्या फोडल्या… शेतकरी आंदोलनाचे मन सुन्न करणारे PHOTOS

आज आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले. नियोजित मार्ग सोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांबरोबर वेगवेगळया ठिकाणी चकमक झाली. यावेळी पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या. काही ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला.

आणखी वाचा- …आणि प्रत्युत्तर म्हणून आंदोलक शेतकरी तलवारी काढून पोलिसांच्या दिशेने पळाले

यावेळी झालेल्या हिंसाचारात बसेस आणि पोलीस वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. एका ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी तलवारी बाहेर काढल्या. परिस्थिती चिघळल्यानंतर हे आंदोलक शेतकरी तलवारी काढून पोलिसांच्या मागे लागले होते. दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करुन तिथल्या खांबावर झेंडा फडकवला आहे.