22 September 2020

News Flash

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर केजरीवाल सरकारमधील गोपाल राय यांचा राजीनामा

गोपाल राय यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमधील परिवहन मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गोपाल राय यांच्याकडील खाती आता दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडे देण्यात आली आहेत.
‘आप’ने सुरू केलेल्या बससेवेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गोपाल राय यांच्यावर करण्यात आल्यानंतर सोमवारी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मी स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. जर या प्रकरणात मी दोषी आढळलो, तर तुरुंगात जाण्याचीही माझी तयारी आहे. त्यानंतर मंगळवारी त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करीत राजीनामा सादर केला. गोपाल राय यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रकृतीच्या कारणांमुळे मी कालच केजरीवाल यांच्याकडे परिवहन मंत्रीपदाच्या कारभारातून आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली होती, असेही गोपाल राय यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 4:38 pm

Web Title: delhi transport minister gopal rai resigns
Next Stories
1 चीनकडून देशातील तरुणांना ‘स्पर्म’दानाचे आवाहन, बदल्यात ६५ हजार रुपये किंवा आयफोन
2 ‘त्या’ मंत्र्याने ‘डिअर’ म्हटल्याने स्मृती इराणी नाराज; ट्विटरकरांच्या मजेशीर प्रतिक्रिया
3 निहलानींना पदावरून काढून प्रश्न सुटणार नाही – अनुराग कश्यप
Just Now!
X