05 August 2020

News Flash

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी‘आप’ उमेदवारांची यादी जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ आम आदमी पार्टीने (आप) मंगळवारी आपल्या ७० उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली.

 

१५ आमदारांना उमेदवारी नाकारली

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ आम आदमी पार्टीने (आप) मंगळवारी आपल्या ७० उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पातपारगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. विद्यमान १५ आमदारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

लोकसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले दिलीप पांडे, आतिशी आणि राघव चढ्ढा हेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पांडे यांना तिमारपूरमधून, आतिशी यांना कालकाजीमधून तर चढ्ढा यांना राजेंद्रनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

आठ महिलांना संधी

पक्षाच्या समितीने सर्व म्हणेज ७० उमेदवारांच्या नावाला मान्यता दिली आहे, असे सिसोदिया यांनी सांगितले. उमेदवारांमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत सहा महिला उमेदवार होत्या. नावांची घोषणा झाल्यानंतर केजरीवाल यांनी सर्वाना शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. गेल्या वेळी आम आदमी पक्षाने ६७ जागाजिंकल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:50 am

Web Title: delhi vidhan sabha election aam aadmi party candidate list akp 94
Next Stories
1 आरोपींना फाशीच!
2 ‘जामिया’ प्रकरणात मानवी हक्क आयोग सक्रीय
3 वणव्यांच्या धुरामुळे मेलबर्नच्या नागरिकांचा श्वास कोंडला
Just Now!
X