News Flash

जोरदार वादळाचा एअर इंडियाच्या विमानाला फटका, क्रू-मेंबर्स जखमी

संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी एआय-467 या विमानाने दिल्लीहून विजयवाडासाठी उड्डाण घेतलं होतं

दिल्लीहून विजयवाडा जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-467 या विमानाला जोरदार वादळाचा फटका बसल्याची माहिती आहे. वादळामुळे विमानाचं नुकसान देखील झाल्याचं समजतंय. या घटनेत विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत, पण काही केबिन क्रू-मेंबर्स जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

शनिवारी(दि.21) संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी एआय-467 या विमानाने दिल्लीहून विजयवाडासाठी उड्डाण घेतलं होतं. रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी विमान विजयवाडा येथे पोहोचणं अपेक्षित होतं. पण या दरम्यान भीषण वादळाचा फटका या विमानाला बसला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणी प्रवासी जखमी झालेला नाही. पण विमानाचं नुकसान झालंय. एअर इंडियाकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.


शुक्रवारी देखील अशीच एक घटना समोर आली होती. यामध्ये तिरुअनंतपुरम येथून कोच्ची जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका बसला होता. या विमानात 172 प्रवासी होते. सुदैवाने या घटनेतही कोणीही जखमी झाले नव्हते. या घटनेचाही एअर इंडियाकडून तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 3:10 pm

Web Title: delhi vijayawada air india plane damaged cabin crew injured sas 89
Next Stories
1 दिल्लीत पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार; अक्षरधाम मंदिराजवळची घटना
2 पुणे : “हा तर हिंदू धर्माचा, प्रभू श्रीरामाचा अपमान”; शशी थरुर यांचा सरकारवर हल्लाबोल
3 #HowdyModi : हे अशक्यच… ह्युस्टनला यायचं आणि ऊर्जेसंदर्भात चर्चा करायची नाही : मोदी
Just Now!
X