16 December 2017

News Flash

दिल्लीत चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार

सनलाईट परिसरात २३ वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करुन नंतर तिला फेकून दिले.

नवी दिल्ली | Updated: June 12, 2016 10:32 AM

दिल्लीत एका तरुणीवर दोन नराधमांनी अपहरण करुन गाडीतच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयापासून जवळच असलेल्या सनलाईट परिसरात एका २३ वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करुन नंतर तिला फेकून दिले. शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे.
पीडित तरुणीने सदर घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. सदर तरुणी एका रेस्तरॉमध्ये जेवण घेण्यासाठी गेली असता स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन तरूणांनी तिचं अपहरण केलं. यानंतर त्या तरुणीवर गाडीतच अतिप्रसंग करून तिला रस्त्यावरच फेकून दिलं आणि आरोपी फरार झाले.
या तरुणीने गाडीचा नंबर पोलिसांना सांगितला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांवरही अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

First Published on June 12, 2016 10:32 am

Web Title: delhi woman alleges gang rape in moving car
टॅग Crime,Gang Rape,Rape