04 December 2020

News Flash

“बलात्काऱ्यांना सहा महिन्यात फासावर लटकवा”, नरेंद्र मोदींना पत्र

"कायदा फक्त बनवून फायदा नाही, तर त्यांची अंमलबजावणीही केली पाहिजे"

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं असून बलात्काऱ्यांना आरोप सिद्ध झाल्यानंतर सहा महिन्यात फासावर लटकवलं पाहिजे अशी मागणी केली आहे. कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याची गरज असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. तसं पोलिसांची संख्या वाढवून, कामाची जबाबदारी वाढवण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

“कायदा फक्त बनवून फायदा नाही, तर त्यांची अंमलबजावणीही केली पाहिजे. बलात्काऱ्यांना सहा महिन्यात मृत्यूदंडाची शिक्षा केली जावी अशी माझी विनंती आहे. यासाठी सर्व प्रक्रिया सुरु करण्यात यावी,” असं स्वाती मलिवाल यांनी पत्रात लिहिलं आहे.

यावेळी स्वाती मलिवाल यांनी हैदराबादमधील बलात्कार आणि हत्येच्या तसंच राजस्थानमध्ये सहा वर्षाच्या मुलीवर करण्यात आलेल्या बलात्कारावर भाष्य केलं. देशभरात मुलींना अशा पाशवी कृत्यांना सामोरं जावं लागत आहे अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे. “त्या दोघीही आज आपल्या सोबत नाहीत पण त्यांची किंकाळी आम्हाला शांत बसू देत नाही आहे. त्यांना किती यातना झाल्या असतील याचा विचारही करवत नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्वाती मलिवाल यांनी पोलिसांनी आपल्याला जंतर मंतरवर आमरण उपोषण कऱण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप केला आहे. देशभरातील बलात्कारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वाती मलिवाल आमरण उपोषण करणार होत्या. पण पोलिसांनी जंतर मंतरवर बॅरिकेट्स उभारले असून, त्यांनी तिथे बसण्यास परवानगी नाकारली असल्याचं सांगितलं आहे. दिल्ली पोलिसांनी मात्र निदर्शन कऱण्यासाठी आपण कोणतीही परवानगी नाकारली नसल्याचा दावा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 4:12 pm

Web Title: delhi woman commission swati malival letter to narendra modi on rape accused sgy 87
Next Stories
1 शिर्डी एक्स्प्रेसचा डब्बा रुळावरून घसरला
2 गेल्या दहा वर्षात रेल्वेची स्थिती सर्वात वाईट; मंदीच्या वातावरणात मोदी सरकारला आणखी एक झटका
3 #LoksattaPoll: ‘बुलेट ट्रेनची महाराष्ट्राला गरज नाही’; ८१ टक्के वाचकांचे मत
Just Now!
X