केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम देशाचे गृहमंत्री असताना त्यांच्यावर पत्रकार परिषदेत बूट फेकून त्यांचा निषेध करणारे जर्नैल सिंह हे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून निवडून आले आहेत.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांच्या निवडणुकीत पहिल्याच फटक्यात २८ जागांवर विजय प्राप्त करत इतिहास रचणाऱया आम आदमीने विविध भागातील सामान्य नागरिकांना एकत्र घेऊन निवडणूक लढविली होती. यामध्ये पत्रकार असलेले जर्नैल सिंह यांचाही समावेश होता. त्यांनी याआधी अण्णा हजारे यांच्या जनलोकपालसाठीच्या आंदोलनातही सक्रीय सहभाग घेतला होता.
जर्नैल सिंह दिल्लीत आम आदमी पक्षाच्या वतीने निवडणुकीला उभे होते. यात त्यांनी भाजप प्रवक्ते राजीव बब्बर यांचा तब्बल दोन हजार मतांनी पराभव केला आहे.
‘झाडू की झप्पी’
पी.चिदंबरम गृहमंत्री असताना एका पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी १९८४च्या शीख दंगलीप्रकरणी जगदीश टायटलर यांना देण्यात आलेल्या क्लिनचीट विषयी उत्तर देण्यास टाळले होते. त्यावेळी जर्नैल सिंह यांनी त्यांच्यावर बूट फेकून निषेध दर्शविला होता. त्यानंतर त्यांना याप्रकरणी अटकही करण्यात आली होती. याविषयी जर्नैल सिंह यांनी माफीही मागितली होती. राजकीय माध्यमातून भ्रष्ट राजकारण्यांना उत्तर द्यायचे ठरविले असल्याचेही त्यांनी ‘आम आदमी’त प्रवेश करताना म्हटले होते.
कोण आहेत अरविंद केजरीवाल?