News Flash

करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाईची मागणी

दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी कोविड-१९ विषयक नियमांचे उल्लंघन करणारे सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आणि त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासारखी कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या एका आठवड्यात ज्यांनी प्रचार केला त्या सर्वांना सक्तीच्या गृहविलगीकरणात ठेवण्याचे आदेश केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

करोनाच्या काळात मेळावे, सार्वजनिक सभा आणि रोड-शो आयोजित करण्यात आले त्या वेळी राजकीय पक्ष, त्या पक्षांचे नेते आणि प्रचारक यांनी मुखपट्ट्यांच्या वापराबाबतचे नियम धाब्यावर बसविले, निष्काळजीपणे केलेल्या प्रचारामुळे त्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला, असेही याचिकेत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:28 am

Web Title: demand for action against political leaders violating corona rules abn 97
Next Stories
1 संकटसमयी मूकदर्शक बनू शकत नाही!
2 भारताच्या मदतीसाठी अमेरिका तत्पर
3 आयात क्रायोजेनिक टँकरचे सरकारकडून राज्यांना वाटप
Just Now!
X