News Flash

नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी उपाय करण्याची मागणी

पूर आणि दुष्काळी स्थितीबाबत लोकसभेत चिंता व्यक्त करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी तसेच कृषी क्षेत्राच्या सुधारणेसाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी

| August 2, 2014 02:47 am

पूर आणि दुष्काळी स्थितीबाबत लोकसभेत चिंता व्यक्त करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी तसेच कृषी क्षेत्राच्या सुधारणेसाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी सदस्यांनी केली.
पूर आणि दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी पी.कुरियन यांनी केली. स्वामिनाथन अहवाल स्वीकारण्यास सरकार तयार आहे काय, हे सरकारने जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
 २००६ मध्ये या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. समितीने उत्पादनाच्या खर्चाच्या किमान ५० टक्के जास्त हमी भाव असावा अशी शिफारस केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 2:47 am

Web Title: demand rise for swaminathan report national commission on farmers
Next Stories
1 भारत-अमेरिका शिखर बैठकीसाठी विषय सूची तयार करणार- जॉन केरी
2 शस्त्रसंधीला प्रारंभ होताच गाझामध्ये हिंसाचार सुरू
3 सहारणपूर दंगलीतील आरोपीबरोबर अखिलेश यांचे छायाचित्र
Just Now!
X