30 October 2020

News Flash

उत्तराखंड प्रकरणातून मोदी धडा शिकतील हीच आशा, राहुल गांधींचा टोला

उत्तराखंडमध्ये बहुमत चाचणीच्या बाजूने ६१ पैकी ३३ आमदारांनी मतदान केले

राहुल गांधी यांनी थेटपणे मोदींच्या वक्तव्यावर कोणतीही टिप्पणी न करता त्यांना एका संस्कृत सुभाषिताच्या माध्यमातून टोला लगावला.

देशातील जनता आणि आमच्या पूर्वजांनीच उभ्या केलेल्या संस्थांकडून लोकशाहीची हत्या कदापि सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यातून काहीतरी धडा घेतील. अशी मला आशा आहे, असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लगावला. उत्तराखंडमधील बहुमत चाचणीमध्ये हरिश रावत यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार उत्तीर्ण झाले. त्यामुळे तोंडावर आपटलेल्या केंद्र सरकारने लगचेच एक पाऊल मागे घेत तेथील राष्ट्रपती राजवट उठवली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयात सांगितले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला.


ते म्हणाले, उत्तराखंडमध्ये लोकशाहीचा विजय झाला आहे. भाजपने वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही चांगले काम करून त्याला प्रत्युत्तर दिले. देशातील जनता आणि आमच्या पूर्वजांनी उभ्या केलेल्या संस्था लोकशाहीची हत्या कदापि सहन करणार नाहीत. नरेंद्र मोदी यातून काहीतरी धडा घेतील, असे मला वाटते.
उत्तराखंडमध्ये बहुमत चाचणीच्या बाजूने ६१ पैकी ३३ आमदारांनी मतदान केले. या चाचणीचा निकाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 1:03 pm

Web Title: democracy won in uttarakhand says rahul gandhi
टॅग Uttarakhand
Next Stories
1 हरिश रावत यांच्याकडे बहुमत, उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट मागे घेणार
2 मल्ल्यांविरोधात आरोपपत्र दाखल झाल्यावर प्रत्यार्पणासाठी प्रयत्न – जेटली
3 Vijay Mallya: विजय मल्ल्या यांना भारतात पाठवू शकत नाही, ब्रिटनची परराष्ट्र मंत्रालयाला माहिती
Just Now!
X