News Flash

नोटाबंदीमुळे टळला तरुणीचा सौदा

२० लाख रुपयांना भावानेच तरुणीचा सौदा केला होता

प्रातिनिधिक छायाचित्र

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. सरकारकडून नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे सांगितले जात आहेत, तर लोकांना होणाऱया त्रासावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. संपूर्ण संसद नोटाबंदीमुळे दणाणून गेली आहे. मात्र राजस्थानातील अलवरमधील एका तरुणीला या निर्णयाचा फायदा झाला आहे.

राजस्थानमधील एका महिलेची विक्री केली जाणार होती. मात्र नोटबंदीच्या निर्णयामुळे या तरुणीसमोरील मोठे संकट टळले. राजस्थानमध्ये राहणाऱ्या तरुणीचा तिच्या भावानेच विक्री करण्यासाठी सौदा केला होता. चुलन भावाच्या मदतीने भावाने बहिणीची विक्री करण्यासाठी सौदा निश्चित केला होता. दोघे भाऊ एका दलालाकडे बहिणीची विक्री करणार होते. २० लाखांना हा सौदा नक्की झाला होता. रोख रकमेच्या स्वरुपात ही रक्कम दिली जाणार होती.

बुधवारी दलाल तरुणीच्या भावाला २० लाख रुपये देणार होता. मात्र नोटाबंदीमुळे दलालाला पैशांची जुळवाजुळव करता आली नाही. यानंतर दलालाने तरुणीच्या भावाला धनादेश देण्याची तयारी दर्शवली. यावरुन दलाल आणि तरुणीचा भाऊ यांच्यात मोठ्या वाद झाला.

‘भाऊ आणि दलाल यांच्यात वाद झाला. या वादाचा फायदा घेत तरुणी तिथून पळून गेली. त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात येऊन संपूर्ण प्रकार आम्हाला सांगितला,’ अशी माहिती अलवरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पारस जैन यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 7:49 pm

Web Title: demonetisation 21 year old woman saved from being sold in 20 lakh rupees
Next Stories
1 …तर उचित ठरणार नाही; पाकचा भारताला इशारा
2 संसदेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली कॅबिनेट बैठक
3 राज्यसभेतील टिकेनंतर मोदी आणि मनमोहन सिंगांचे हस्तांदोलन
Just Now!
X