News Flash

नोटाबंदीवरुन संसदेत विरोधक आक्रमक, लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सत्ताधा-यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यसभेत विरोधकांनी नोटाबंदीवरुन सरकारची कोंडी केली आहे. (छायाचित्र सौजन्य - राज्यसभा टीव्ही)

नोटाबंदीच्या निर्णयावरुन शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करावे लागले. सरकार चर्चेसाठी तयार आहे, पण विरोधकांनी कामकाज होऊ द्यावे अशी भूमिका सत्ताधा-यांनी मांडली. पण त्यानंतरही विरोधकांनी गोंधळ घालणे सुरुच ठेवल्याने गुरुवारी सकाळच्या सत्रात संसदेचे कामकाज होऊ शकले नाही.

संसदेचे हिवाळी अधिवेशन नोटाबंदीमुळे चांगलेच तापले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. लोकसभेत शुक्रवारी कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. लोकसभेत नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा तसेच मतदान घ्यावे अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. विरोधकांच्या गोंधळानंतर शेवटी सोमवारपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

राज्यसभेतही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राज्यसभेतही नोटाबंदीवर चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली. यामुळे राज्यसभेचे कामकाजही दुपारपर्यंत दोन वेळा तहकूब करावे लागले. दरम्यान, विरोधकांच्या गोंधळावरुन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे, पण विरोधक का गोंधळ घालत आहे हे समजत नाही, विरोधक चर्चेपासून पळ काढतायंत अशी प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी दिली. वेळ पडल्यावर पंतप्रधान स्वतः उपस्थित असतात, पण त्यावरुन कामकाज रोखून ठेवणे चुकीचे आहे असे नायडू म्हणालेत. गुलाम नवी आझाद यांनी राज्यसभेत उरी हल्ल्यावर केलेल्या विधानावर काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही नायडू यांनी केली आहे. भाजपने लोकसभेतील खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:19 pm

Web Title: demonetisation both houses adjourn after protests
Next Stories
1 ‘झाकीर नाईक म्हणायचा, प्रत्येक मुस्लिमाने दहशतवादी व्हावे’
2 नोटा बदलताना शाईचा वापर नको; निवडणूक आयोगाचे अर्थ मंत्रालयाला पत्र
3 खुशखबर, आता पेट्रोल पंपावरही काढता येणार पैसे
Just Now!
X