05 April 2020

News Flash

‘५जी’ तंत्रज्ञानाविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये निदर्शने

स्वित्झर्लंडच्या संसदेपुढे ही निदर्शने करण्यात आली असून फाइव्ह जी मोबाईल अँटेना उभारण्यास लोकांचा विरोध आहे

(संग्रहित छायाचित्र)

सर्व जण उत्सुकतेने फाइव्ह जी बिनतारी तंत्रज्ञानाची वाट पहात असले तरी त्याविरोधात स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे हजारो लोकांनी निदर्शने केली. फाइव्ह जी तंत्रज्ञानाने आरोग्याला मोठा धोका असल्याचे या निदर्शकांचे म्हणणे आहे.

स्वित्झर्लंडच्या संसदेपुढे ही निदर्शने करण्यात आली असून फाइव्ह जी मोबाईल अँटेना उभारण्यास लोकांचा विरोध आहे. फ्रिक्वेन्सिया या गटाने ही निदर्शने केली असून या संस्थेच्या सह अध्यक्ष टॅमलिन शिबलर यांनी सांगितले की,  फाइव्ह जी तंत्रज्ञानाचा वापर घातक असून त्याच्यामुळे आरोग्याला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. युरोपात मोनॅको या देशात पहिल्यांदा चीनच्या हुआवे कंपनीद्वारे फाइव्ह जी तंत्रज्ञान लागू करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 1:24 am

Web Title: demonstrations in switzerland against 5g technology abn 97
Next Stories
1 भारताची विकासाची वाटचाल शाश्वत मार्गाने
2 कांदा साठवणुकीवर मर्यादा घालण्याचा विचार
3 #Howdy Modi : ह्यूस्टन झाले मोदीमय, पंतप्रधान मोदी यांचे जल्लोषात स्वागत
Just Now!
X