News Flash

इन्सानियत: कब्रस्तानात नाकारलेल्या पार्थिवाचं हिंदू स्मशानभूमीत दफन

मिया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने

खाजा मिया या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू २२ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचं पार्थिव कब्रस्तानात नेण्यात आलं. रमझानच्या पवित्र महिन्यात मिया यांचा मृत्यू झाला होता. मात्र कब्रस्तानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. मात्र अखेर हिंदू स्मशानभूमीत मिया यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले. हैदराबादजवळच्या कुरनूलमध्ये ही घटना घली. खाजा मिया आणि त्यांचं कुटुंब गेल्या १० वर्षांपासून रंगा रेड्डी जिल्ह्यातील गंधमगुडा या ठिकाणी वास्तव्य करत होते. मात्र मिया यांचं पार्थिव कब्रस्तानात जेव्हा नेण्यात आलं तिथे अंत्यसंस्कारांसाठी परवानगी नाकारण्यात आलं

त्या भागात सहा कब्रस्तान आहेत. मात्र करोनाच्या भीतीने या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास संमती देण्यात आली नाही. खरंतर मिया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. मात्र कुणीही संमती दिली नाही तेव्हा करायचं हा प्रश्न मिया यांच्या कुटुंबीयांना पडला. मात्र त्यानंतर समोर आलं ते माणुसकीचं उदाहरण. एका हिंदू स्मशान भूमीत दफन करण्यात आलं.

मिया यांच्या घरातले लोक आर्थिक अडचण आणि लॉकडाउनमुळे त्यांचं पार्थिव फार दूर घेऊन जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांचं पार्थिव गंधमगुडा येथील एका हिंदू स्मशानभूमीत नेण्यात आलं. तिथे मुस्लिम धर्मातील प्रथेप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला. सध्याच्या घडीला कोविड १९ च्या भीतीमुळे कब्रस्तानामध्ये पार्थिवाचा दफनविधी करण्यास मनाई करत आहेत. मात्र हिंदू स्मशानभूमीत ज्यावेळेस मिया यांच्या अंत्यविधीबाबत विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यावेळी त्यांना संमती देण्यात आली. मिया यांचा मृत्यू करोनामुळे झाला नाही. तरीही त्यांच्या कुटुंबीयांना दफनविधी करण्यासाठी कब्रस्तानात संमती मिळाली नाही. अशात माणुसकीचं एक उदाहरण समोर आलं आहे. http://siyasat.net/ ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 7:03 pm

Web Title: denied a place in graveyard muslim man buried in shamshanghat scj 81
Next Stories
1 ठाकरे सरकार-रेल्वेमंत्री वादावरून ओवेसींनी काढले पीयूष गोयल यांना चिमटे; म्हणाले …
2 भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांवर ओवेसी भडकले; हा असंवैधानिक लॉकडाउन का स्वीकारला?
3 ३० एप्रिलपर्यंत पॉझिटिव्ह असणाऱ्या २८ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणं नव्हती-स्टडी रिपोर्ट
Just Now!
X