03 June 2020

News Flash

देवबंद अतिरेक्यांची गंगोत्री – गिरीराज सिंह

देवबंदने हाफिज सईद सारखे दहशतवादी निर्माण केले आहेत, असा आरोपही सिंह यांनी केला आहे.

गिरिराज सिंह, केंद्रीय मंत्री

उत्तर प्रदेशातील देवबंद हे ठिकाण अतिरेक्यांची गंगोत्री आहे, असं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केलं आहे. सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे पत्रकारांशी ते बोलत होते. याच शहरात सुन्नी मुस्लिम समुदयासाठी काम करणारी दारुल उलूम देवबंद ही संस्था कार्यरत आहे. देवबंदने हाफिज सईद सारखे दहशतवादी निर्माण केले आहेत, असा आरोपही सिंह यांनी केला आहे.

गिरिराज सिंह म्हणाले, “मी यापू्र्वीही म्हणालो होतो की देवबंद ही अतिरेक्यांची गंगोत्री आहे. जगातील सर्व मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हे देवबंदचे आहेत. यामध्ये हाफिज सईद आणि इतरांचा समावेश आहे.” महिन्याभरापासून देवबंद येथे मुस्लिम महिला सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेत्याने देवबंदवर शाब्दिक हल्ले चढवले आहेत.

“हे लोक ‘सीएए’विरोधात नव्हे तर भारतविरोधी आहेत. ही एक प्रकारची खिलाफत चळवळ आहे, अशा शब्दांत गिरिराज सिंह यांनी इथल्या आंदोलकांवर हल्लाबोल केला. यापूर्वी सिंह यांनी शाहीन बाग येथील आंदोलकांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. इथले आंदोलक हे आत्मघातकी पथकं आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 4:57 pm

Web Title: deoband is gangotri of terrorists produced hafiz saeed says giriraj singh aau 85
Next Stories
1 काँग्रेसकडे निवडणुकांसाठी चेहराच नाही – कपिल सिब्बल
2 मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला ११ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
3 हातावर पोट असणारा तो एका रात्रीत झाला १२ कोटींचा मालक
Just Now!
X