19 January 2021

News Flash

राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश, खासदारांवर ‘हरी’कृपा; मोदींचे कौतुकोद्गार

सदेत त्यांच्या येण्याने एक प्रगल्भ नेता आपल्या सगळ्यांनाच मिळाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

हरिवंश यांची निवड राज्यसभेच्या उपसभापतीपदी झाली आहे. ते NDA चे उमेदवार होते. त्यांची निवड होणार हे निश्चित झाले होते.

राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. सगळ्या खासदारांवर आता हरीकृपा राहिल असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. दोन्हीकडे हरी होते. मात्र हरिवंश नारायण यांचा विजय झाला याचा मनस्वी आनंद झाला असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हरिवंश यांनी आपल्या वृत्तपत्रतात संसद कशी चालवावी याचा स्तंभ चालवला होता. त्यामुळे त्यांना संसद कशी चालवायची हे ठाऊक आहे. दशरथ मांझी यांची बातमी शोधून काढणारे ते पत्रकार आहेत. ते राज्यसभेच्या उपसभापतीपदी बसल्याने त्यांच्या अनुभवाचा सगळ्यांनाच फायदा होईल यात शंका नाही असेही मोदी यांनी म्हटले आहे. संसदेत त्यांच्या येण्याने एक प्रगल्भ नेता आपल्या सगळ्यांनाच मिळाला आहे.

हरिवंश यांची निवड राज्यसभेच्या उपसभापती झाल्याबद्दल मी त्यांचे सगळ्या सदनाच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांच्यासारखा प्रगल्भ माणूस आपल्याला उपसभापती म्हणून लाभला ही बाब महत्त्वाची आहे. त्यांच्या अनुभवाचा, लेखनाचा आपल्याला सगळ्यांनाच फायदा होईल यात काहीही शंका नाही. ही लढत दोन हरिंमध्ये होती. एककीडे हरिवंश होते. तर दुसरीकडे हरिप्रसाद. मी हरिप्रसाद यांचेही अभिनंदन करतो त्यांनीही चांगली लढत दिली असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 12:06 pm

Web Title: deputy chairman elections nda candidate harivansh narayan singh elected as rajya sabha deputy chairman
Next Stories
1 मामासोबत प्रेमसंबंध, भाचीने आई-वडिलांसह ८ जणांवर केला विषप्रयोग
2 धक्कादायक : रडणाऱ्या भारतीय बाळाला विमानाबाहेर फेकण्याची ब्रिटिश एअरवेजच्या कर्मचाऱ्याची धमकी
3 शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी, इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स ३८ हजारांवर
Just Now!
X