News Flash

भारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती

२०१७-१८ मध्ये भारतामध्ये ७,३०० लोक मिलेनियर क्लबच्या यादीत सामिल झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र

भारतातून दारिद्र्याचे उच्चाटन होण्यास अजून बराच काळ लोटावा लागणार आहे. परंतु, उच्च आर्थिक वाढीमुळे देशात कोट्यधीशांच्या संख्येत हजारोने भर पडत आहे. कोट्यधीशांच्या संख्येत भारतात यंदा ७,३०० कोट्यधीश वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.  क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार, २०१७-१८ मध्ये भारतामध्ये ७,३०० लोक मिलेनियर क्लबच्या यादीत सामिल झाले आहेत. या नव्या लोकांमुळे भारतामध्ये कोट्यधीशांची संख्या ३.४३ लाख झाली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती ६ ट्रिलियन डॉलर्स अर्थात ४४१ लाख कोटी रुपये आहे. २०२० या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल ३,८२,००० वर पोहोचण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

देशातली गरीबी कमी झाली की नाही हा संशोधनाचा विषय आहे. देशातल्या करोडपतींची संख्या मात्र झपाट्याने वाढतच आहे. क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार २०२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल. अहवालात म्हटले आहे की, भेलेही भारतात संपत्तीच्या प्रमाणात वाढ झाली असेल. पण, यात प्रत्येक भारतीयाचा हिस्सा नाही. देशातील नागरिकांकडे असलेली संपत्ती अद्यापही चिंतनाचा विषय आहे. अहवालातील आकडेवारीवरून दिसते की, सुमारे ९२ टक्के लोकांकडे १०,००० डॉलरपेक्षाही कमी संपत्ती आहे. तर, दुसऱ्या बाजूला संपत्तीचा मोठा हिस्सा काही लोकांकडेच आहे.

वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी क्रेडिट सुएझने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २०१८ च्या मध्यापर्यंत ३ लाख ४३ हजार कोट्यधीश होते. मागील वर्षी त्यांची संख्या ७,३०० ने वाढली. या नव्या कोट्यधीशांपैकी ३,४०० जणांकडे पाच-पाच कोटी डॉलर्स म्हणजेच ३६८-३६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे तर १५०० जणांकडे १० कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे ७३६-७३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

डॉलर्सच्या तुलनेत भारताच्या एकूण संपत्तीमध्ये २.६ टक्क्यांनी वाढल्यामुळे ६,००० अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. २०२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल. भारतातील श्रीमंती आणि गरीब यांच्यातील तफावत ५३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. २०२३ पर्यंत भारतातील कोट्याधीशांच्या संखेत मोठी वाढ होणार आहे. २०२३ मध्ये भारतामध्ये ५,२६,००० लोक कोट्याधीश होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 3:32 am

Web Title: desi wealthy club adds 7300 totalling 343 k worth usd 6 trillion
Next Stories
1 केबल, ब्रॉडबँड सेवाही रिलायन्सच्या ‘मक्तेदार’ मुठीत!
2 राणा कपूर यांना मुदतवाढीस नकार
3 रिलायंस इंडस्ट्रीजचा नवा विक्रम, दुसऱ्या तिमाहीत 9 हजार 516 कोटींचा शुद्ध नफा
Just Now!
X