भारतातून दारिद्र्याचे उच्चाटन होण्यास अजून बराच काळ लोटावा लागणार आहे. परंतु, उच्च आर्थिक वाढीमुळे देशात कोट्यधीशांच्या संख्येत हजारोने भर पडत आहे. कोट्यधीशांच्या संख्येत भारतात यंदा ७,३०० कोट्यधीश वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.  क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार, २०१७-१८ मध्ये भारतामध्ये ७,३०० लोक मिलेनियर क्लबच्या यादीत सामिल झाले आहेत. या नव्या लोकांमुळे भारतामध्ये कोट्यधीशांची संख्या ३.४३ लाख झाली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती ६ ट्रिलियन डॉलर्स अर्थात ४४१ लाख कोटी रुपये आहे. २०२० या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल ३,८२,००० वर पोहोचण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातली गरीबी कमी झाली की नाही हा संशोधनाचा विषय आहे. देशातल्या करोडपतींची संख्या मात्र झपाट्याने वाढतच आहे. क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार २०२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल. अहवालात म्हटले आहे की, भेलेही भारतात संपत्तीच्या प्रमाणात वाढ झाली असेल. पण, यात प्रत्येक भारतीयाचा हिस्सा नाही. देशातील नागरिकांकडे असलेली संपत्ती अद्यापही चिंतनाचा विषय आहे. अहवालातील आकडेवारीवरून दिसते की, सुमारे ९२ टक्के लोकांकडे १०,००० डॉलरपेक्षाही कमी संपत्ती आहे. तर, दुसऱ्या बाजूला संपत्तीचा मोठा हिस्सा काही लोकांकडेच आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desi wealthy club adds 7300 totalling 343 k worth usd 6 trillion
First published on: 19-10-2018 at 03:32 IST