News Flash

सरकारचा जनतेवर विश्वास नाही – ममता बॅनर्जींचा निशाणा

बोटांवर शाई लावण्याच्या निर्णयाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध दर्शवला आहे.

सरकारचा जनतेवर विश्वास नाही अशी टीका ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी केली होती.

बँकेतून वारंवार पैसे काढणा-यांच्या बोटांवर शाई लावण्याच्या निर्णयाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारचा जनतेवर विश्वास नसल्याचे या निर्णयावरुन दिसते अशी टीकाच त्यांनी केली आहे.

काही लोक बँकेतून किंवा एटीएममधून दिवसभरात वारंवार पैसे काढत असल्यामुळे विनाकारण गर्दी वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच बँकांमध्ये असणाऱ्या मर्यादित चलनसाठ्यामुळे इतर लोकांनाही पुरेसे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे बँकेच्या कॅश काऊंटरवर एखाद्या व्यक्तीने व्यवहार केल्यानंतर त्याच्या हाताच्या बोटावर मतदानाप्रमाणे शाईची खूण करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात पोटनिवडणूक होणार आहे. त्यावेळी बँकेत लावलेली शाई आणि मतदानादरम्यान लावणारी जाणारी शाई यात गोंधळ उडू शकतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. केंद्राच्या या निर्णयावर निवडणूक आयोगाची भूमिका काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:43 pm

Web Title: desperate attempt to start a black mechanism mamata banerjee slams modi government
Next Stories
1 लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तुम्ही काय पावले उचललीत; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल
2 ‘मी सहा हजार कोटी रुपये बँकेत भरलेच नाहीत’
3 रंग न जाणारी दोन हजारची नोट बनावटच – अर्थसचिव
Just Now!
X