म्हैसुरू येथील डीआरडीओच्या प्रयोगशाळेची कामगिरी
आपल्या देशात दुधात भेसळीचे प्रमाण खूपच जास्त असून त्यातील दोन तृतीयांश दूध हे अन्न सुरक्षेचे मानक पूर्ण करीत नाही. २०१५ मध्ये आरोग्य मंत्रालयाने जे नमुने तपासले होते त्यातील सहा टक्के नमुन्यात अपमार्जकांची (डिर्टजट)भेसळ आढळून आली होती. त्यामुळे कृत्रिम दूध हा आपल्या देशातील एक मोठा प्रश्न आहे. दैनंदिन आयुष्यात आपण कधी दूध तपासण्याच्या भानगडीत पडत नाही व तशी सोपी साधने उपलब्ध नाहीत, पण आता म्हैसुरू येथील संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेने दुधातील भेसळ ओळखण्याचा एक संच तयार केला आहे. त्यामुळे दुधात भेसळ केलेले सहा रासायनिक पदार्थ काही मिनिटात ओळखता येतात. ही प्रयोगशाळा संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या अखत्यारीत काम करते. उत्तर भारतात सणाच्यावेळी दूधभेसळ होते. कृत्रिम दूध विकले जाते, ते दुधासारखेच दिसते. रोजची वॉशिंग पावडर व रिफाइन्ड तेल वापरून हे दूध तयार करतात.त्यात पाण्याचाही वापर असतो. महाराष्ट्रातही दूध भेसळ मोठय़ा प्रमाणात आहे पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
अटल इनोव्हेशन मिशनमध्ये दूध भेसळ तीन मिनिटात ओळखण्यासाठी अवघा चार रूपये खर्च असलेली सुविधा असावी, हे आव्हान नीती आयोगानेही स्वीकारले आहे. सीएसआयआरने यापूर्वी दूध भेसळ ओळखण्यासाठी क्षीर स्कॅनर तायर केले असून त्यामुळे पन्नास पैशात अवघ्या ४०-४५ सेकंदात दुधातील भेसळ ओळखता येते. संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेचे वैज्ञानिक एम.सी.पांडे यांनी सांगितले की, सणाच्या वेळी दुधातील भेसळ वाढत असते कारण दुधाचे उत्पादन सणाच्या वेळी वाढत नाही. आमच्या संस्थेने दूध भेसळ ओळखण्याचा जो संच विकसित केला आहे त्यात काही रसायनांचा वापर केला आहे. जर दुधात अपमार्जके म्हणजे डिर्टजट असतील तर त्या संचातील कागदाची पट्टी दुधात बुडवली तर हिरवी, पिवळी किंवा निळी होते, त्यावरून कुठली रसायने आहेत तेही कळते. ०.५ टक्क्यांपर्यंत भेसळ त्यात कळते.

दूध भेसळ ओळखा दोन रूपयात
म्हैसुरू येथील वैज्ञानिकांनी ९ लाख रूपये खर्चून हा दूध भेसळ शोधणारा संच तयार करण्याचा प्रकल्प पूर्ण केला आहे. यातील एका संचात ३२० पट्टय़ा असतात त्यामुळे आठ प्रकारचे रासायनिक भेसळ घटक ओळखता येतात. एका संचाची किंमत २ रूपये आहे. इतर दूध भेसळ ओळखण्याच्या उपकरणात खूप प्रगत उपकरणे लागतात. म्हैसुरू प्रयोगशाळेने तयार केलेला संच हा सैनिकांसाठी असून तो दूरस्थ ठिकाणी दुधातील भेसळ ओळखण्यासाठी वापरला जातो. सामान्य लोकांनाही तो उपलब्ध करून देता येईल.

MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…