X
X

हिंसाचार, कट रचणे या सगळ्याला विकास हेच उत्तर-पंतप्रधान नरेंद्र मोदी

टीकाकार आणि विरोधकांना आपल्या भाषणातून उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा समोर आणला विकासाचा मुद्दा

कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा एखाद्या घटनेचा कट रचणे या सगळ्याला एकच उत्तर असते ते म्हणजे विकास. विकासामुळे विकसित झालेल्या भागातून या सगळ्या गोष्टी आपोआप हद्दपार होतात असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भिलाई या ठिकाणी स्टिल प्रकल्पाच्या आधुनिकीकरण योजनेचे त्यांनी उद्घाटन केले त्यावे ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भिलाईमध्ये रोड शोही केला. मागील तीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा दौरा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयआयटी भिलाईचेही उद्घाटन करणार आहे. तसेच केंद्राच्या उडान योजने अंतर्गत रायपूर ते जगदलपूरच्या विमानसेवेचा शुभारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे. रायपूर हे भारतातील पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट शहर होईल आणि इतर शहरांसमोर आदर्श ठेवेल असे प्रतिपादनही त्यांनी केले. नया रायपूरमध्ये पंतप्रधानांनी इंटिग्रेड कमांड आणि कंट्रोल सेंट्रलच्या उद्घाटनालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हजेरी होती.

27