मुख्यमंत्री विजय रुपानी यांची मंजुरी

अहमदाबाद : दक्षिण गुजरातमधील नार्गोल बंदर ‘ग्रीनफिल्ड पोर्ट’ म्हणून विकसित करण्यास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंजुरी दिली आहे. या बंदराचा विकास सरकारी-खासगी भागीदारीतून बांधा, मालकीहक्क घ्या, चालवा आणि हस्तांतरित करा (बीओओटी- बूट) या तत्त्वावर ५० वर्षांच्या वाढीव मुदतीसाठी करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे.

या ग्रीनफिल्ड बंदर प्रकल्पाचा बीओओटी कालावधी ३० वर्षांऐवजी ५० वर्षे ठेवून गुजरात सरकार एक उदाहरण समोर ठेवत आहे. ‘बीओओटी’ कालावधी वाढवण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयामुळे विकासकाला गुंतवणुकीवर अधिक परताव्याची हमी मिळेल. सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यातून विकासकाला प्रोत्साहन मिळू शकेल. या बंदराच्या विकासासाठी जागतिक निविदा काढून विकासकाची निवड करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक, मजबूत आणि लवचीक असेल, असेही गुजरात सरकारने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ३८०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी विकासकाला पूर्णपणे मुभा देण्यात येणार आहे.

Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
adani realty msrdc latest marahti news
वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत
Development of six villages
बीकेसीच्या धर्तीवर मढ, मार्वेसह सहा गावांचा विकास लांबणीवर?
Bhushan Gagrani BMC commissioner
मुंबईला मिळाले नवे आयुक्त, ‘या’ अधिकाऱ्यावर आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेची जबाबदारी

मुंबईतील जेएनपीटी बंदराची सध्याची कंटेनर हाताळणीची क्षमता एक कोटी आहे. २०२५ पर्यंत त्याची क्षमता कमी होईल. त्यामुळे गुजरात विकसित करीत असलेल्या ग्रीनफिल्ड बंदराला मोठी संधी आहे. मुंबईपासून सुमारे १४० किमी उत्तरेला आणि सुरतपासून १२० किमी असलेल्या नार्गोल बंदरात विविध प्रकारच्या कंटेनरची हाताळणी करण्यात येईल. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसून हे बंदर नजीक आहे.