22 October 2020

News Flash

बलिया हत्याकांड : फरार मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहला लखनऊमध्ये अटक

अन्य दोन आरोपी देखील ताब्यात

धीरेंद्र सिंह

उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील दुर्जनपूर गावात घडलेल्या गोळीबारातील प्रमुख आरोपी धीरेंद्र प्रताप सिंह याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तीन दिवसांपासून फरार धीरेंद्र सिंह लखनऊमधील जनेश्वर मिश्र पार्क येथून पकल्या गेला.

धीरेंद्र सिंहवर उत्तर प्रदेश पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आतापर्यंत नावाजलेल्या आठ आणि जवळपास २५ अज्ञात आरोपींपैकी केवळ ९ जणांना अटक झालेली आहे.

या हत्याकांडातील नावाजलेले आरोपी संतोष यादव व अमरजीत यादव यांना पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली होती. तर, सह आरोपी अगोदरच अटक करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी मुख्य आरोपी धीरेंद्रचे भाऊ नरेंद्र प्रताप सिंह, देवेंद्र प्रताप सिंह यांना देखील अटक केली होती. तर, शनिवारी याचप्रकरणी मुन्ना यादव, राजप्रताप यादव व राजन तिवारी यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते.

बलियातील दुर्जनपूर गावात दोन गटांत सरकारी दुकान वाटपावरून उफळलेल्या वादानंतर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 1:56 pm

Web Title: dhirendra singh and his accomplices were arrested from lucknow today msr 87
Next Stories
1 फ्रीजमधील पदार्थांच्या पॅकिंगवर आढळले करोनाचे सक्रिय विषाणू; चीनचा दावा
2 एटीएममधून ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास द्यावं लागणार अतिरिक्त शुल्क?
3 बिहारमध्ये ‘जर’ किंवा ‘तर’ नाही, नितीशकुमारच होणार मुख्यमंत्री; अमित शाहांची जाहीर घोषणा
Just Now!
X