News Flash

झारखंड सरकार देणार दहा रुपयांत धोतर आणि साडी!

झारखंड सरकार आता एक नवा उपक्रम सुरू करत आहे. झारखंडमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जनतेला अवघ्या दहा रुपयांमध्ये साडी आणि धोतर

| November 22, 2013 01:59 am

झारखंड सरकार आता एक नवा उपक्रम सुरू करत आहे. झारखंडमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जनतेला अवघ्या दहा रुपयांमध्ये साडी आणि धोतर देणार आहे. तसेच त्यांना तेलही स्वस्त दरात उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे हेमंत सोरेन यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.
सोरेन म्हणले, “झारखंड सरकार सार्वजनिक वितरण प्रणाली(पीडीएस) योजनेतून गरीब नागरिकांना दहा रुपयांत साडी व धोतर उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना डाळ आणि तेल स्वस्तामध्ये देणार आहे. तसेच सरकार अशाच काही आणखी योजना आणू इच्छिते आहे आणि योजना थेट गरिबांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे” असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 1:59 am

Web Title: dhotisaree to bpl families for rs ten each by jharhand govt
Next Stories
1 भ्रष्टाचाराबाबत भाजपची दुतोंडी भूमिका-सोनिया गांधी
2 काँग्रेस वाळवीसारखी: मोदींची टीका
3 काँग्रेस आणि‘आप’कडून अल्पसंख्याकांचे लांगूलचालन
Just Now!
X