जम्मू काश्मीरमधील सोपोरे जिल्ह्यात बुधावारी भारतीय सुरक्षा दलातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सीआरपीएफ जवानांच्या पथकावर झालेल्या दहशतवादी हल्लात एक जवान शहीद झाला तर एका सामान्य नागरिकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. मात्र या हल्ल्यानंतर सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये मरण पावलेल्या आपल्या आजोबांच्या मृतदेहावर एक तीन वर्षांचा चिमुकला रडत बसल्याचे दिसत आहे. भाजपाचे प्रवक्त संबित पात्रा यांनी हा फोटो ट्विटवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी उपहासात्मक टोला लगावला आहे. मात्र यावर अभिनेत्री दिया मिर्झा आणि पात्रा यांच्यामध्ये ट्विटवर शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पहायला मिळालं आहे.

पात्रा यांनी शेअर केलेल्या फोटोचे ट्विट कोट करुन रिट्विट करत दियाने या फोटोवर आक्षेप नोंदवला आहे. “तुमच्याकडे थोडीशी सुद्धा सहानुभूति उरली नाही का?”, असा प्रश्न दियाने विचारला आहे.

 

दियाच्या या ट्विटनंतर पात्रा यांनी तिला उत्तर दिलं आहे. “हा मॅडम माझ्यात संवेदना (भावना) आहेत, माझ्या सेनेसाठी आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी मग तो कोणत्याही धर्माचा का असेना माझ्यात संवेदना आहेत. मात्र तुमच्याप्रमाणे मी ठराविक ठिकाणी संवेदना नाही दाखवत. मी सिलेक्टीव्ह प्लेकार्ड होल्डर (ठराविक प्रकरणांमध्ये निषेध नोंदवणारा) नाहीय हे लक्षात ठेवा. मी तुमचा चाहता आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा निषेध करणारे पोस्टर तुम्ही हातात पकडून उभं असल्याचं मला पहायचं आहे,” असं पात्रा यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

संबित को फिर जवाब देते हुए द‍िया ने कहा, ”संवेदनाएं कभी भी सेलेक्टिव नहीं होती हैं. या तो वे आपके पास होती हैं या फिर नहीं. किसी भी बच्चे को इस तरह के दर्द से नहीं गुजरना चाहिए. आप अपनी राजनीति बंद कीजिए और मैं आपको अपना सपोर्ट करुंगी. फिर चाहे मेरे हाथों में प्लेकार्ड हो या नहीं.”

पात्रा यांच्या या वक्तव्यावरही दियाने उत्तर दिलं आहे. “संवदेना (भावना) कधीच ठराविक नसतात. एकतर त्या तुम्हाला असतात किंवा नसतात. कोणत्याही मुलाला अशाप्रकारच्या दु:खातून जावं लागू नये. तुम्ही तुमचे राजकारण बंद करा आणि मी तुम्हाला माझा पाठिंबा देईल. मग तेव्हा माझ्या हातामध्ये प्लेकार्ड असो किंवा नसो,” असं उत्तर दियाने दिलं आहे.

पात्रा यांनी शेअर केलेल्या फोटोवर ट्विटवर अनेक जणांनी त्यांच्यावर टीका केल्याचे पहायला मिळालं आहे. एकीकडे पात्रा समर्थक तर दुसरीकडे या फोटोवरुन राग व्यक्त करणारे ट्विपल्स असा वाद बुधवारी ट्विटवर पहायला मिळाला.