देशात करोनाची तसरी लाट येण्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आरोग्य सेतू नंतर विनामूल्य XraySetu अ‌ॅप लाँच केले आहे. याव्दारे व्हॉट्सअ‌ॅपवर चेस्ट एक्सरे पाठवल्यानंतर करोना आहे की नाही, हे काही मिनिटात कळणार आहे. त्यामुळे देशवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. रुग्णांची होणारी धावपड देखील थांबणार आहे. ही सुविधा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी वरदान ठरू शकते. सध्या यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. हे अ‌ॅप कसं काम करणार याचे वैशिष्ट्य काय, हे समजून घेऊया.

XraySetu एक एआय (Artificial intelligence-based) आधारित प्लॅटफॉर्म आहे, जे व्हॉट्सअ‍ॅपवर चालविल्या जात आहे. XraySetu इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायंस (IISc) व्दारा स्थापित एनजीओ आणि Artpark (एआय आणि रोबोटिक्स टेक्नोलॉजी पार्क) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), भारत सरकारने हेल्थटेक स्टार्टअप निरमाई सोबत मिळून तयार केले आहे.

आणखी वाचा- सर्वांसाठी समान नियम ठेवा; परदेशी कंपन्यांच्या लशींसाठी नियम शिथिल केल्यानंतर सिरमची केंद्राकडे मागणी

आर्टपार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमाकांत सोनी यांचे म्हणणे आहे की, कोविड – १९ प्रकरणांची ओळख पटविण्यासाठी आरटी-पीसीआर किंवा सीटी-स्कॅन सुविधा नसलेल्या अशा लहान आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी हे खास डिझाइन केले आहे. अशा परिस्थितीत XraySetu वर साध्या एक्स-रेद्वारे करोना इंफेक्शन समजेल. ज्यासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल.

६ ते ७ महिने मोफत सुविधा

उमाकांत सोनी म्हणाले की पुढील ६ ते ७ महिने ही सुविधा मोफत उपलब्ध आहे. जरी यालाठी शुल्क आकारले तर ते १०० रुपयांपेक्षा कमी असले. ही सुविधा गेल्या आठवड्यापासून वापरली जात असून ५०० डॉक्टरांनी त्याचा वापर केला आहे. येत्या १५ दिवसात १०,००० डॉक्टरांचे जाळे तयार करण्याचे आम्ही विचार करीत आहोत.

आणखी वाचा- दिलासादायक….सलग सातव्या दिवशी नव्या बाधितांचा आकडा दोन लाखांच्या आत

डॉक्टर किंवा रेडिओलॉजिस्ट एक्सरेसेटूच्या व्हॉट्सअ‍ॅप बॉटवर चेस्ट एक्स-रे अपलोड करतात, जे एआय च्या मदतीने त्यांचे विश्लेषण करतात आणि १० ते १५ मिनिटांत अहवाल तयार करतात. व्हॉट्सअ‍ॅपवर येणार्‍या लो रिजोल्यूशन चेस्ट एक्स-रेचा फोटो पाहून करोना संक्रमन आहे की नाही हे समजू शकते, उमाकांत सोनी यांनी सांगितले.

बरेच वेगवेगळे आजार शोधता येतील

XraySetu वर केवळ कोविड-१९ नाही तर इतर अनेक आजारांचा शोधता येतील यामध्ये न्यूमोनिया, टीबी सारख्या आजारांचा समावेश असेल. त्यामुळे हे अ‌ॅप फायद्याचे ठरणार आहे.

असा काढा Xray

  • आरोग्य तपासणीसाठी https://www.xraysetu.com वर डॉक्टरांना भेट द्या आणि नंतर ‘Try the Free X-raySetu Beta’ बटणावर क्लिक करा.
  • आता प्लॅटफॉर्म आपल्याला दुसर्‍या पृष्ठावर नेईल जेथे आपण वेब किंवा स्मार्टफोन अ‌ॅपद्वारे व्हॉट्सअॅप-आधारित चॅटबॉट निवडू शकता.
  • हे डॉक्टरांना XraySetu ची सेवा सुरू करण्यासाठी +91 8046163838 या क्रमांकावर व्हाट्सअ‌ॅप मेसेज पाठविण्यास सांगेल.
  • यानंतर, रुग्णाला XraySetu फोटोवर क्लिक करावी लागेल आणि त्यानंतर काही मिनिटांत, दोन पानांचा अहवाल  उपलब्ध होईल.
  • एखाद्या व्यक्तीला करोना असल्यास त्याला त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असल्याचे या अहवालात देखील सांगितले जाईल.