06 August 2020

News Flash

तीन वर्षांपूर्वीची पॉर्न क्लिप विद्यापीठातील प्राध्यापकानं केली शेअर, मग…

विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिली तक्रार

आसामधील दिब्रुगढ विद्यापीठात असलेल्या एका सहाय्यक प्राध्यापकाचा नकोसा कारनामा समोर आला आहे. या प्राध्यापकानं तीन वर्षांपूर्वीची एक पॉर्न क्लिप पॉर्न साईटवर शेअर केली. त्यानंतर गणित विषय शिकवणाऱ्या या प्राध्यापकाविरोधात विद्यापीठाच्या कुलसचिवांनीच तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्राध्यापकाला बेड्या ठोकल्या.

पीटीआयनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. दिब्रुगढ विद्यापीठाच्या कुलसचिवांनी प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांनी पॉर्न व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे, अशी माहिती दिब्रुगढचे पोलीस अधीक्षक श्रीजित टी यांनी दिली. “एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यात प्राध्यापक एका महिलेशी चर्चा करताना दिसत आहे. आम्ही प्राध्यापकाच्या घरी गुरूवारी छापा टाकला. त्यानंतर प्राध्यापकाचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे,” असं श्रीजित टी. यांनी सांगितलं.

“पोलिसांनी प्राध्यापकाची चौकशी केली. यात प्राध्यापकानं गुन्हा कबूल केला आहे. तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ असून, तो गुवहाटीतील एका हॉटेलमधील आहे. ज्यात महिलेसोबत अश्लिल कृत्य आहे, अशी कबूली प्राध्यापकानं दिली आहे,” अशी माहिती श्रीजित यांनी दिली. या व्हिडीओसाठी वापरण्यात आलेला कॅमेरा छापा टाकल्यानंतर जप्त करण्यात आला आहे, असंही ते म्हणाले.

त्या व्हिडीओत दिसणारी ती महिला विद्यापीठाची विद्यार्थिनी नसल्याचं प्राध्यापकानं म्हटलं आहे. याबद्दल प्राध्यापक व विद्यापीठाच्या प्रशासनाकडून उलटतपासणी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हे प्रकरण समोर आल्यानंतर या प्राध्यापकाविरोधात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीला लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितंल.

सुरूवातीला व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्राध्यापकाला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. २६ जून रोजी ही नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे ३० जून रोजी प्राध्यापकानं उत्तर दिलं. मात्र, प्राध्यापकानं दिलेलं उत्तर समाधानकारक नव्हते. त्यामुळे दिब्रुगढ विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 5:22 pm

Web Title: dibrugarh university teacher arrested for sharing porn video bmh 90
Next Stories
1 २४ तासांत ५४ जवान करोना पॉझिटिव्ह
2 धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला १०,००० लोक; तीन गावं केली सील
3 आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा विकास दुबे आहे तरी कोण?
Just Now!
X