डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीनुसार दरवाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला. शुक्रवारी मध्यरात्रीपासून दरवाढ लागू होणार आहे. गेल्याच आठवड्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर तीन रुपयांनी कमी झाले होते. त्यामुळे सुखावलेल्या सामान्यांना डिझेलच्या किंमती महागल्यामुळे पुन्हा एकदा वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. मुंबईमध्ये डिझेलचा नवीन दर प्रतिलिटर ५६.०४ असा असणार आहे. दिल्लीमध्ये हाच दर ४९.६९ रुपये असा असेल.