News Flash

डिझेल एक तर पेट्रोल पावणेदोन रुपयाने स्वस्त होण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे डिझेल प्रतिलिटर एक रुपयाने तर पेट्रोल प्रतिलिटर पावणेदोन रुपयाने स्वस्त होण्याची शक्यता आहे.

| September 30, 2014 04:09 am

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे डिझेल प्रतिलिटर एक रुपयाने तर पेट्रोल प्रतिलिटर पावणेदोन रुपयाने स्वस्त होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांकडून मंगळवारी संध्याकाळी या दर कपातीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे तेल कंपन्यांना होणारा तोटा कमी करण्यासाठी डिझेलचे दर प्रत्येक महिन्याला वाढविण्यात येत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी तेल कंपन्या दरकपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे. आयात केलेल्या कच्च्या तेलाचे प्रतिपिंप दर आणि किरकोळ विक्री किंमत यातील फरक समान झाला असून, आता तेल कंपन्यांना विक्रीमागे प्रतिलिटर एक रुपया जादा मिळत आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 4:09 am

Web Title: diesel price likely to be cut by 1 rupee
टॅग : Diesel,Petrol
Next Stories
1 जयललिता यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी
2 ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना न्यूयॉर्कमध्ये धक्काबुक्की
3 मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना ओ.पन्नीरसेल्वम यांना अश्रू अनावर…
Just Now!
X