News Flash

डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, पेट्रोलही महाग

आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. घसरत चाललेला रूपया आणि मजबूत डॉलरमुळे इंधनाच्या किंमती वाढत आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा विक्रमी स्तरावर जाण्याची मालिका पुन्हा सुरू झाल्याचे दिसते. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दर वाढले.

पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा विक्रमी स्तरावर जाण्याची मालिका पुन्हा सुरू झाल्याचे दिसते. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दर वाढले. पेट्रोलच्या किंमतीतही वाढ होताना दिसत आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत एक लिटर डिझेलचे दर ६९.४६ रूपये झाला आहे. डिझेलचा हा विक्रमी दर आहे. कोलकातात डिझेल ७२.३१ आणि चेन्नईत ७३.३८ तर मुंबईत ७३.७४ रूपये प्रति लिटर दर झाला आहे.

पेट्रोलच्या दरातही वाढ

सोमवारी पेट्रोलच्या दरातही वाढ दिसून आली. त्यामुळे दिल्लीत प्रति लिटर पेट्रोलमध्ये १३ पैशांची वाढ झाली. त्यामुळे तिथे पेट्रोलचे दर ७७.९१ रूपये प्रति लिटर दर होता. तर कोलकातामध्ये ८०.८४, मुंबईत ८५.३३ आणि चेन्नईत ८०.९४ रूपये प्रति लिटर असा दर आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. घसरत चाललेला रूपया आणि मजबूत होत असलेल्या डॉलरमुळे इंधनाच्या किंमती वाढत आहेत. मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली. मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात ५ टक्क्यांची वाढ झाली होती. कच्च्या तेलाशिवाय डॉलरच्या तुलनेत रूपयाची होत असलेली घसरणही इंधनाच्या दरवाढीस कारणीभूत आहे. सध्या रूपया ७० रूपयांच्यावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 10:52 am

Web Title: diesel prices rise for the second consecutive day petrol rates also increase
Next Stories
1 सुरतमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू
2 जम्मू-काश्मीर: ‘कलम ३५ अ’ विरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
3 वाजपेयींचे निधन नक्की कधी झाले?, संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल
Just Now!
X