10 August 2020

News Flash

लुईस बर्जर प्रकरण : दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

अमेरिकेच्या लुईस बर्जर कंपनीने लाच दिल्याच्या प्रकरणातील संशयित असलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज गोवा गुन्हे अन्वेषण विभागापुढे जाबजबाबासाठी उपस्थित राहण्याचे टाळले.

| August 13, 2015 03:11 am

अमेरिकेच्या लुईस बर्जर कंपनीने लाच दिल्याच्या प्रकरणातील संशयित असलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज गोवा गुन्हे अन्वेषण विभागापुढे जाबजबाबासाठी उपस्थित राहण्याचे टाळले. काँग्रेसचे नेते असलेल्या कामत यांना अटकेची भीती वाटत असून त्यांचे दोनदा जाबजबाब झाले आहेत. गोव्यातील एका मोठय़ा जलप्रकल्पाच्या कामात त्यांचेही हात दोन हप्त्यात लाच देऊन ओले करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी आज अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेला त्यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी पत्र पाठवले असून त्यात कामत यांनी म्हटले आहे, की आपण वकिलांशी सल्लामसलत करीत असून चौकशी अधिकाऱ्यांपुढे उपस्थित राहू शकत नाही. कामत यांना गुन्हे अन्वेषण शाखेने समन्स पाठवले होते. जेआयसीएची मदत असलेल्या प्रकल्पाचे प्रमुख आनंद वाचासुंदर यांनी असा दावा केला, की माजी मुख्यमंत्री कामत व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना आपण लाच घेताना पाहिले असून त्यांनी न्यायालयात त्याचा तपशीलही दिला. कुठल्या ठिकाणी दोघांना किती पैसा देण्यात आला हे सांगितले. गुन्हे अन्वेषण शाखेने कामत यांच्या जामिनास विरोध केला असून त्यांनी त्यांच्या निवासस्थानी लाच स्वीकारल्याचा दावा न्यूजर्सी येथील व्यवस्थापकीय सल्लागार संस्थेच्या माजी कर्मचाऱ्याने दिलेल्या कबुलीजबाबानुसार केला आहे. २००७ मध्ये काँग्रेसचे मंत्रिमंडळ सत्तेवर होते. लुईस बर्जर कंपनीच्या आणखी एका कर्मचाऱ्यानेही कबुलीजबाबात या दोघांनी लाच घेतल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2015 3:11 am

Web Title: digambar kamat application for anticipatory bail
Next Stories
1 हेलिकॉप्टर दुर्घटनेतील तिघांचे मृतदेह सापडले
2 सर्वोच्च न्यायालाचा दयानिधी मारन यांना दिलासा
3 चीनमध्ये शक्तीशाली स्फोटात ४४ मृत्युमुखी, शेकडो जखमी
Just Now!
X