News Flash

टोल भरण्यासाठी नवीन वाहनांमध्ये डिजिटल टॅगची सुविधा देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांता प्रयत्न असून, त्यांनी अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या.

| November 24, 2016 01:41 am

टोलनाक्याचे प्रातिनिधिक छायाचित्र.

टोल नाक्यांवर पैसे भरताना वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतूक खोळंबते यावर उपाय म्हणून नवीन वाहनांमध्ये डिजिटल टॅगची सुविधा दिली जाणार असून, ती मोटारी व इतर वाहनात उपलब्ध राहील, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल शुल्क भरले जाईल. या प्रक्रियेस लागणारा वेळ कमी असल्याने टोल प्लाझाच्या ठिकाणी लागणाऱ्या वाहनांच्या रांगा दिसणार नाहीत. रोख रक्कम विरहित अर्थव्यवस्था आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांता प्रयत्न असून, त्यांनी अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या. त्यामुळे वापरातील ८६ टक्के चलन माघारी आले.

आपल्या देशात बरेच लोक अजूनही रोख पैसे वापरतात ते थांबवण्यासाठी सरकारने इलेक्ट्रॉनिक व्यवहारांना उत्तेजन देऊन पारदर्शकता आणतानाच काळय़ा पैशाला वाव राहणार नाही अशी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आर्थिक कामकाज सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले, की आतापर्यंत टोल प्लाझावर वाहनांच्या रांगा लागत होत्या, त्यामुळे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वाहन उत्पादकांना नवीन वाहनांमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग लावण्यास सांगितले आहे.

इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट कोड ग्लोबल ही व्यवस्था रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅगबरोबर वापरता येते व त्यामुळे टोल डिजिटल पद्धतीने घेतला जाईल व वाट पाहावी लागणार नाही. कमी किमतीच्या नोटा व नवीन नोटा येण्यास वेळ लागणार आहे, त्यामुळे महामार्गावर २८ नोव्हेंबपर्यंत सरकारने टोल सूट जाहीर केली आहे. वाहन टोल प्लाझावर आल्यानंतर टोलचे पैसे आरएफआयडी कार्डमधून कापून घेतले जातील, त्यामुळे वाहन थांबवावे लागणार नाही. या टॅगचे रिचार्जिगही करता येईल. सरकारने आधार प्रणालीवर आधारित पेमेंट व कार्ड पेमेंट तसेच डिजिटल बँकिंगला प्राधान्य दिले जाणार आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेसचाही त्यात समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 1:41 am

Web Title: digital tags facility at toll naka
Next Stories
1 पंतप्रधान सभागृहात; विरोधक संसदेबाहेर
2 माध्यमांविरुद्ध शिवसेनेचा थयथयाट
3 कोटय़वधीची छपाईगल्लत शिवसेनेला महागात!
Just Now!
X