स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अनेक डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले आहे. कोविड – १९ या साथीच्या रोगाआधी ६० टक्क्यांवर असलेली वापरकर्त्यांची संख्या आता ६७ टक्के झाली आहे, असे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले.
महामारी आणि लॉकडाऊन दरम्यान ई-कॉमर्समध्ये वाढ झाल्यामुळे बँकेच्या डिजिटल व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.

“मला वाटते की ही एक मोठी संख्या आहे आणि आम्ही अशी बँक आहोत की जेथे सर्व प्रकारच्या ग्राहकांना सेवा दिली जाते, लोक डिजिटल गोष्टी वापरण्यात तरबेज आहेत आणि जे लोक नाहीत असे दोनही प्रकारचे ग्राहक आमच्या बँकेत येतात,” असे खारा यांनी पीटीआयला सांगितले.

डिजिटल कर्ज देण्याच्या प्लॅटफॉर्म – योनो अॅप मध्ये चालू आर्थिक वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे.

सध्या, योनोचे ३५ दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने बँक दररोज ३५,०० ते ४०,००० बचत खाती उघडत आहे, असे ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात योनोमार्फत सुमारे १६,००० कोटी रुपयांची पूर्व-नियोजित वैयक्तिक कर्जे वितरित करण्यात आली आहेत, असे खारा यांनी सांगितले. एसबीआय लाइफ विमा, एसबीआय जनरल विमा आणि एसबीआय कार्ड आणि एसबीआय म्युच्युअल फंड यासह बँकेच्या सहाय्यक कंपन्यांच्या उत्पादनांचे वितरण करण्यातसुध्दा हे अॅप मदत करते. यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंत जवळजवळ २५ लाख वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी आणि सात लाख जीवन विमा पॉलिसी योनो प्लॅटफॉर्मचा वापर करून जारी करण्यात आल्या आहेत, असे खारा यांनी सांगितले.

“जास्तीत जास्त वापरकर्ते योनो वर येत आहेत आणि ते वापरत आहेत, आम्ही फक्त हे सुनिश्चित करीत आहोत की हे सर्व अधिक बळकट कसं करता येईल जेणेकरून ते अधिक लोकांचे व्यवहार हाताळतील आणि तयार करतील आणि बँकेसाठी फायदा निर्माण करतील, ” ते म्हणाला.

ते म्हणाले की बँक आपल्या सर्व डिजिटल वाहिन्यांद्वारे वाढत्या व्यवहारासाठी आधारभूत पायाभूत सुविधा वाढवत आहे.