News Flash

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे रावण – दिग्विजयसिंह

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.

| January 9, 2014 03:45 am

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी संघाची तुलना चक्क रावणाशी केली असून, या टीकेमुळे पुन्हा नवा वाद उदभवण्याची शक्यता आहे.
गाझियाबादमधील कौशंबी येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर बुधवारी झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना दिग्विजयसिंह यांनी भाजप आणि संघावर निशाणा साधला.
भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी ‘आप’च्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. आता भाजप आपला या हल्ल्याशी काही संबंध नसल्याचे म्हणते आहे. ते त्यांच्या धोरणानुसारच आहे. संघाच्या १५० संघटना आहेत. सर्वांचे मूळ हे संघामध्येच आहे. एका हाताने हल्ला करायचा आणि दुसऱया हाताने मलम चोळायचे. बहुचेहऱयांसारखाच हा प्रकार! यामुळे आपल्याला रामायणातील त्या व्यक्तीरेखेची आठवण होते, ज्याची दहा तोंडे आणि एकच शरीर होते, अशी प्रतिक्रिया दिग्विजयसिंह यांनी ट्विटरवर व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 3:45 am

Web Title: digvijay compares rss with ravana
Next Stories
1 भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात ‘आप’चे ‘स्टिंग’रे!
2 अँड्रॉइडच्या ‘जादू’वर जपानी टायझेनचा उतारा!
3 बांगलादेशात ‘अवामी लीग’ची सत्ता
Just Now!
X