अन्नसुरक्षा विधेयकामध्ये त्रुटी असल्याचे थेट पंतप्रधानांना पत्र लिहीणाऱया गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर आज मंगळवार काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी पलटवार केला.
दिग्विजय सिंह म्हणाले, “भाजप आणि त्यांचे स्वत:ला बहुचर्चित समजणारे नेते अन्नसुरक्षा विधेयकाला विरोध करून देशातील गरिब जनतेचा अधिकार हिरावून घेण्याचे काम करत आहेत. विधेयकाबाबतची त्यांची भूमिका गरिबांच्या विरोधात असल्याचे दर्शविते. यातूनच त्यांचा खरा रंग समजतो. असेही दिग्विजय सिंह म्हणाले. त्याचबरोबर मोदींचा अन्नसुरक्षा विधेयकाच्याबाबतीत राज्यसभेतील भाजपच्या नेत्यांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहीले. त्यांना सुषमा स्वराज यांच्यावरही विश्वास नाही का? असा सवालही दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून उपस्थित केला आहे.
नरेंद्र मोदींनी अन्नसुरक्षा विधेयकात काही त्रुटी असल्यासंबंधीचे पत्र पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना लिहीले आहे. यावर दिग्विजय सिंह यांनी या प्रतिक्रिया दिल्या आहेत.