26 November 2020

News Flash

काश्मिरी जनतेला सैन्य आणि दहशतवादी दोघेही मारतात; दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य

मोदी सरकारच्या काश्मीरनितीवर त्यांनी शंका व्यक्त केली आहे.

Digvijaya Singh : काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह हे देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे.

काश्मीरप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वेळी त्यांनी थेट भारतीय लष्कराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ‘काश्मिरी लोकांना एका बाजूने दहशतवादी मारतात तर दुसरीकडून भारतीय लष्कराचे जवान.’ दिग्विजय सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भारतीय लष्करावर आरोप करून दिग्विजय सिंह यांना नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल विचारला जात आहे.

भारतीय लष्करावर आरोप करताना त्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना काश्मिरी गुंडांकडून होत असलेल्या हाणामारीच्या व्हिडिओकडेही दुर्लक्ष केले आहे. सीआरपीएफच्या जवानाला जेव्हा मारण्यात येत होते. तेव्हा त्याच्या हातात हत्यार होते. पण तरीही त्याने त्या हत्याराचा वापर न करता, संयम दाखवत जमावाकडून मार खाल्ला होता. तरीही दिग्विजय सिंह यांच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी एका व्हिडिओत लष्कराच्या जीपवर हातपाय बांधलेल्या एका काश्मीरी युवकाचा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ पाहून जर दिग्विजय सिंह यांनी हे आरोप केले असतील तर हे पूर्ण जाणून न घेता त्यांनी केलेले वक्तव्य असेल, असे सांगण्यात येते. कारण लष्कराने दगडफेक करणाऱ्यांपासून बचावासाठी त्या युवकाचा ढालीसारखा उपयोग केला होता. नंतर त्या युवकाला सुरक्षित सोडण्यात आले.
दिग्विजय सिंह यांनी भारतीय लष्करावर आरोप केले. परंतु, दगडफेक करणाऱ्यांविरोधात, खुलेआम भारतविरोधात घोषणा देणाऱ्या व लष्करावर हल्ला करणाऱ्यांबाबत त्यांनी काहीच भाष्य केले नाही. मोदी सरकारच्या काश्मीरनितीवर त्यांनी शंका व्यक्त करत पाकिस्तानविरूद्ध युद्धाचीही भितीही व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 9:12 am

Web Title: digvijaya singh jammu kashmir controversial statement indian army terrorist
Next Stories
1 काश्मीरमधील दंगेखोरांना पाकिस्तानकडून ‘कॅशलेस फंडिंग’
2 पेट्रोल १.३९ तर डिझेल १.०४ रूपयांनी महागले, आजपासून नवे दर लागू
3 राज्यराणी एक्स्प्रेसला अपघात
Just Now!
X