कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर ट्विटबोल केला. भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांची जयपूरमध्ये सभा होणार आहे. या सभेला मुस्लिम धर्मातील पुरुषांनी शेरवानी आणि टोपी घालून तर महिलांनी बुरखा घालून यावे, अशी सूचना पक्षाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी हा प्रकार म्हणजे ड्रेस कोड की मतांचे राजकारण असा प्रश्न उपस्थित केला.
सभेला मुस्लिमांनी बुरखा घालून आणि त्यांची विशिष्ट टोपी घालून यावे, असे भाजपला वाटते. हा ड्रेस कोड आहे की मतांचे राजकारण? माध्यमांनी कृपया हा प्रश्न भाजपला विचारावा, असे दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हंटलंय.
भाजपच्या अल्पसंख्याक विभागाने जयपूरमध्ये होणाऱया सभेसाठी मुस्लिमांनी ठरावीक पेहरावात यावे, अशी सूचना केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट केले.