पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय उलथापाथ सुरू आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते व  माजी खासदार दिनेश त्रिवेदींनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपात प्रवेश करताना, दिनेश त्रिवेदींनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचार व हिंसाचाराचा आरोप करत जोरादर निशाणा साधला. तसेच, यावेळी त्यांनी हे देखील सांगितले की, मी निवडणूक लढवली किंवा नाही लढवली तरी मी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय राहील.

बंगालमध्ये टीएमसीला नाकारलं आहे. बंगालच्या जनतेला आता केवळ विकास हवा आहे, भ्रष्टाचार व हिंसा नको. बंगालच्या जनतेला आता प्रत्यक्षात बदल घडवायला तयार आहे. राजकारण काही खेळ नाही, गंभीर विषय आहे. ममता बॅनर्जी आपल्या आदर्शांना विसरल्या असल्याचंह त्यांनी बोलून दाखवलं.

मोदींसोबत चर्चा, मतभेद, वाद होऊ शकतात; पण ममता बॅनर्जी….- दिनेश त्रिवेदी

तर,“मी जे करतो ते मनापासून करतो. मी आधी काहीच ठरवलेलं नव्हतं. भावनिक नातं असणाऱ्या पक्षामधून बाहेर पडताना तुमच्याकडे काही तरी ठोस कारण असलं पाहिजे,” असं दिनेश त्रिवेदी यांनी या अगोदर म्हटलं होतं. तसेच, “भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर मी निषेध केल्याने माझाच निषेध करण्यात आला. आपण छळ का करावा? हिंसाचाराला कोणतीच जागा नाही. बंगाली शांतताप्रिय आहेत. मग हे डोकं इतर दुसऱ्या ठिकाणी कशासाठी वापरायचं? मला वाटतं बंगालनेच याचं उत्तर शोधलं पाहिजे,” असं मत देखील दिनेश त्रिवेदी यांनी व्यक्त केलं होतं.

राज्यसभेतच तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा राजीनामा; मोदींची स्तुती करत म्हणाले…

राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असतानाच  दिनेश त्रिवेदी यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. एवढच नाहीतर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची स्तुतीदेखील केली होती. बंगालमधील हिंसाचार पाहून माझी घुसमट होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली होती.