News Flash

डायनॉसॉर समाजशील प्राणी होते

मंगोलिया येथे डायनॉसॉरचे काही जीवाश्म मिळाले होते.

| November 15, 2016 12:21 pm

डायनॉसॉर हे आपल्याला वाटते त्याप्रमाणे एकलकोंडे नव्हते तर ते समाजशील प्राणी होते. ते कळपाने राहात असत व मरतानाही ते समूहाने मरत. ते आपण म्हणतो त्याप्रमाणे क्रूर नव्हते. कॅनडातील अल्बर्टा विद्यापीठातील विद्यार्थी ग्रेगरी फन्स्टन यांनी सांगितले की, डायनॉसॉरबाबतच्या कथा आहेत त्यानुसार ते क्रूर, महाकाय होते व बेदरकारपणे एकटे हिंडत होते पण प्रत्यक्षात ते समूहाने राहात होते. आपण समजतो तसे ते नव्हते व आधुनिक प्राण्यांसारखे होते. ते समाजशील होते. मंगोलिया येथे डायनॉसॉरचे काही जीवाश्म मिळाले होते. त्यात तुटलेल्या हाडांचा समावेश होता. वैज्ञानिकांनी त्याचा अभ्यास करून अ‍ॅविमिमस डायनॉसॉर्सची जोडणी करून बघितली. आधुनिक काळात पक्षी थव्याने राहतात, तर त्या काळात पक्ष्यासारखे डायनॉसॉर हे कळपानेच राहात होते. पण ते जगताना समूहाने जगत होते पण मरतानाही समूहाने का मरत होते याचा उलगडा झालेला नाही. डायनॉसॉर्स समाजशील नव्हते हा गैरसमज तर त्यामुळे दूर झाला आहे. क्रॅटेशियस काळात डायनॉसॉर्सचे समूह समाजशील बनले होते पण तो निष्कर्ष जीवाश्मांच्या अभ्यासातून काढला आहे की आणखी काही तंत्र त्यात वापरले आहे हे समजलेले नाही. या प्राण्यांच्या हाडांचे जीवाश्म सापडले असून ते कळपाने राहात होते. ज्युरासिक व ट्रायसिक काळापेक्षा ते क्रॅटॅशियस काळात जास्त प्रबळ होते. पक्ष्यांचे पूर्वज मानल्या जाणाऱ्या या प्राण्यांच्या हाडांचा साठाच सापडल्याने हे नवीन संशोधन शक्य झाले आहे. सायन्टिफिक रिपोर्ट्स या नियतकालिकात त्याबाबत माहिती प्रसिद्ध झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:03 am

Web Title: dinosaur is social animals
Next Stories
1 मुस्लीम, लॅटिनो, आफ्रिकींचा छळ थांबवा – ट्रम्प
2 ट्रम्प यांची हिटलरशी तुलना केल्याने इतिहास शिक्षकाला पगारी रजेची शिक्षा
3 २०१६ सर्वात उष्ण वर्ष असल्याचा जागतिक हवामान संघटनेचा इशारा
Just Now!
X