भारत व  व्हिएतनाम येथील पर्यटन क्षेत्रास विशेष बळकटी आणण्याच्यादृष्टीने कोलकात्ता ते हनोई अशी थेट विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. ही विमानसेवा ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती व्हिएतनामचे भारतातील राजदूत फाम सहं चौ यांनी दिली आहे.

याबाबत एएनआयला माहिती देतांना त्यांनी सांगितले की, कोलकात्ता ते थेट हनोई दरम्यान विमानसेवेचा आज निर्णय घेण्यात आला आहे. ही विमान सेवा ३ ऑक्टोबर २०१९ पासून सुरू केली होईल. याशिवाय व्हिसासाठी अर्ज करणा-या भारतीय प्रवाशांसाठी आम्ही ऑनलाइन केंद्र देखील सुरू केले असल्याची त्यांनी माहिती दिली.

यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी आपल्या देशाचा भारतास असलेल्या पाठिंब्याची देखील पुष्टी केली.