द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानं चर्चेत आलेल्या भारतातील फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांना धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंखी दास यांनी स्वतः दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ज्या व्यक्तींनी धमकी दिली त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचं दास यांनी म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अंखी दास यांनी धमकी मिळाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केल्याचं वृत्त आजतकनं दिलं आहे. दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की, “फेसबुकच्या भारतच्या पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही,” असं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं.

आणखी वाचा- भाजपाबाबत नरमाईच्या ‘त्या’ वृत्तावर फेसबुकनं केला खुलासा

ऑनलाइन पोस्ट आणि मजकूरमधून त्यांच्यावर हल्ला होण्याची तसेच जिवाला धोका असल्याचं अंखी दास यांनी तक्रारीत म्हटलं आहे. ज्या पेजवरून आणि ट्विटमधून त्यांना धमकी देण्यात आली आहे, तक्रारीमध्ये त्या फेसबुक आणि ट्विटर हॅण्डलची नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांनी तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने ‘फेसबुक हेट स्पीच रूल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स’ या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अंखी दास यांचं नाव चर्चेत आलं आहे. या प्रकरणावरून देशात राजकारण तापलं असतानाच दास यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

आणखी वाचा- फेसबुकच्या भूमिकेवरून वादंग

अंखी दास यांच्या भूमिकेवर शंका

भाजपचे तेलंगणमधील आमदार टी. राजा सिंह यांच्या अल्पसंख्यांकांविरोधातील कथित िहसात्मक मजकूरप्रकरणी फेसबुकच्या भारतातील धोरण संचालक आँखी दास यांनी दखल घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत, ‘भाजपनेत्यांच्या द्वेषमूलक पोस्टवर कारवाई केल्यास भारतातील व्यवसायास धक्का बसू शकतो, असे फेसबुकच्या अन्य कर्मचाऱ्यांना सांगितले, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने वृत्तात म्हटले आहे. भाजपनेत्यांबाबत आँखी दास यांनी घेतलेली भूमिका सत्ताधारी भाजपला व्यापक अर्थाने लाभदायक होती, असे फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे असल्याचेही या वत्तात नमूद केले आहे.