एअर इंडियाद्वारे एका अपंग महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एअर इंडियाद्वारे आपल्यासाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच आपल्याला विमानातून खेचून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप प्रवासी अनिता घई यांनी केला आहे. घई या दिल्ली विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
अनिता घई या त्यांच्या चार सहकाऱ्यांबरोबर शुक्रवारी एअर इंडियाच्या विमानाने देहरादून येथून दिल्ली येथे परतत होत्या. त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधी विमानतळावर उतरल्यावर फ्लाइट कमांडरकडे व्हीलचेअरची मागणी केली. मात्र सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना चेअर नाकारण्यात आली आणि त्यानंतर त्यांना विमानातून खेचून बाहेर काढण्यात आले, असा घई यांचे म्हणणे आहे. मात्र एअर इंडियाच्या अधिका-यांनी हे आरोप फेटाळून लावत घई यांना व्हीलचेअर देण्यात आली होती, असा दावा केला आहे. आम्ही आमच्या प्रवाशांची योग्य प्रकारे काळजी घेत असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले. तसेच त्या दिवशी विमान थोड्या लांब अंतरावर उतरवण्यात आल्याने व्हिलचेअर आणण्यासाठी वेळ लागला, मात्र घई यांनी सांगितलेला कुठलाच प्रकार घडलेला नसून जर आमच्याकडून काही असुविधा झाली असेल तर त्याबद्दल आम्ही मागतो असेही त्यांनी म्हटले.