News Flash

महाविद्यालयांमध्ये अपंगांसाठी पाच टक्के राखीव कोटा?

येत्या १४ एप्रिलपर्यंत यासंदर्भातील नियम निश्चित करण्यात येतील.

| January 3, 2017 05:39 pm

Disabled : या विधेयकानुसार सध्या ६ ते १८ वयोगटातील अपंग व्यक्तींना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे.

आगामी शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना पाच टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. नुकत्याच मंजूर झालेल्या अपंग विधेयकातील नियमांना अंतिम स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे. या विधेयकानुसार सध्या ६ ते १८ वयोगटातील अपंग व्यक्तींना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. यामध्ये सध्या अपंग व्यक्तींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये असणारी आरक्षणाची मर्यादा तीनवरून चार टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली होती. तर उच्च शिक्षणासाठीची आरक्षण मर्यादा तीनवरून पाच टक्के इतकी करण्यात आली होती. आता सरकारकडून या विधेयकातील नव्या नियमांची लवकरात लवकर आखणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या १४ एप्रिलपर्यंत यासंदर्भातील नियम निश्चित करण्यात येतील. हे कायदे अपंगांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी अपंग व्यक्तींसाठी आखून दिलेल्या निकषांची पूर्तता होणार असल्याचेही गेहलोत यांनी सांगितले. याशिवाय, नव्या नियमांनुसार अपंगत्त्वाच्या प्रकारांमध्येही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या यादीमध्ये सात प्रकारांचा समावेश होता. आता ही संख्या २१ इतकी झाली आहे.

अपंग व्यक्तीस भेदभाव करणारी वागणूक दिल्यास दोन वर्षे तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या कायद्याला राज्यसभेने हिवाळी अधिवेशनात मंजुरी दिली होती. अपंग व्यक्तीला संरक्षण मिळावे आणि त्याला योग्य प्रमाणात संधी मिळाव्या यासाठी हा कायदा आहे. राज्यसभेत हा कायदा एकमताने मंजूर झाला. संयुक्त राष्ट्राच्या अपंग व्यक्ती आणि त्या संदर्भातील मुद्दे या समितीने ज्या तरतुदी सुचवल्या होत्या त्यांचा समावेश या विधेयकात करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 5:39 pm

Web Title: disabled may get 5 per cent quota in colleges from next session
Next Stories
1 कोलकात्यात तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा भाजप कार्यालयावर हल्ला
2 दहशतवादी बुरहान वानी शहीद!; जम्मू-काश्मीरच्या आमदाराचे वादग्रस्त विधान
3 पाकिस्तानमध्ये हिंदूविवाहांना मिळणार कायदेशीर मान्यता
Just Now!
X