News Flash

आकाशगंगेतील २८ नवीन ताऱ्यांचा शोध

अनिल पांडे यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले

आपल्या आकाशगंगेतील २८ नवे तारे येथील आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. या संस्थेचे संचालक वहाब उद्दीन यांनी सांगितले की, हे या ताऱ्यांची प्रकाशमानता सतत बदलत असते, हे संशोधन ही दुर्मिळ कामगिरी आहे. ग्लोब्युलर क्लस्टर एनजीसी ४१४७ मध्ये हे तारे सापडले असून कोमा बेरनायसेस तारकासमूहात ते आहेत.

संस्थेचे माजी संचालक अनिल पांडे यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले असून त्यांनी सांगितले की, ग्लोब्युलर क्लस्टरची रचना यातून उलगडणार आहे. नवीन ताऱ्यांशिवाय एनजीसी ४१४७ या क्लस्टरची रचनाही त्यात समजणार आहे. यात डॉ. स्नेहलता, डॉ. ए.के.पांडे यांनी एनजीसी ४१४७  ग्लोब्युलर क्लस्टरची फोटोमेट्रिक निरीक्षणे घेतली. त्यासाठी ३.६ मीटरच्या देवस्थळ प्रकाशीय दुर्बीणाचा वापर केला आहे.

ही दुर्बीण नैनीताल येथे २०१६ मध्ये बसवण्यात आली होती. अस्थिर तारे याचा अर्थ त्यांची प्रकाशमानता सतत बदलताना दिसते. यात ताऱ्याला ग्रहणाचा स्पर्ष किंवा ताऱ्यांचे आकुंचन प्रसरण यामुळे त्याची प्रकाशमानता कमी जास्त होते.  एनजीसी ४१४७ चा शोध ब्रिटिश खगोलवैज्ञानिक विल्यम हर्शेल यांनी १७८४ मध्ये लावला होता. हे क्लस्टर मोठे, प्रकाशमान आहे. आकाशगंगेतील एकूण क्लस्टर्सपैकी प्रकाशमानतेत ते ११२ व्या क्रमांकावर आहे, असे पांडे यांनी सांगितले.

ग्लोब्युलर क्लस्टर हा ताऱ्यांचा गोलाकृती संच असून तो आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे. ग्लोब्युलर क्लस्टर हे गुरुत्वाकर्षणाने बद्ध असतात. त्यामुळे त्यांना गोलाकार प्राप्त होतो. त्यांची तारकीय घनता जास्त असते. ही क्लस्टर्स आकाशगंगेच्या प्रभामंडळात असतात व त्यात जुने तारे असतात, पण त्यांचा आकाशगंगेच्या उत्क्रांतीतील भाग स्पष्ट झालेला नाही. हे संशोधन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये ऑगस्ट महिन्यात प्रकाशित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 11:19 pm

Web Title: discovery of 28 new stars in the galaxy mpg 94
Next Stories
1 ममतांच्या तुष्टीकरणाच्या धोरणांचा विपरीत परिणाम
2 जगातील बलाढ्य आपाचे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात
3 जम्मू : जैश ए मोहम्मदच्या बॉम्ब एक्सपर्टचा सुरक्षा दलांकडून खात्मा
Just Now!
X