News Flash

कृष्णविवरात प्रकाशीय ज्वाळा

होल अर्थ ब्लेझर टेलिस्कोप या आंतरराष्ट्रीय गटाने यातील ३ ते ४ ज्वाळा शोधल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

भारतीय खगोलवैज्ञानिकांना बीएस लॅसिरटी या खूप जास्त वस्तुमानाच्या कृष्णविवरात प्रकाशीय ज्वाळा दिसल्या आहेत. त्यातून त्या कृष्णविवराचे वस्तुमान ठरवता येईल, तसेच प्रकाशाच्या स्रोताचाही मागोवा घेता येईल, असे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने शनिवारी म्हटले आहे.

या कृष्णविवरातील ज्वालेच्या विश्लेषणातून विश्वाच्या उत्पत्तीच्या अवस्थाही समजण्यास मदत होणार आहे. कृष्णविवरातील ज्वाला या खगोलवैज्ञानिकांच्या दृष्टीने संशोधनाचा महत्त्वाचा विषय राहिला असून त्यात भारित कणांचे प्रवाह असतात. ते प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. त्यामुळे या ज्वाळा विश्वातील प्रकाशमान घटक मानल्या जातात. बीएल लॅसिरटी मधील ज्वाळा या १० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर अंतरावर असून त्यातील पन्नास ज्वाळा लहान दुर्बिणीच्या मदतीनेही दिसू शकतात. होल अर्थ ब्लेझर टेलिस्कोप या आंतरराष्ट्रीय गटाने यातील ३ ते ४ ज्वाळा शोधल्या आहेत.

यात आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेचे आलोक चंद्रा यांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२० पासून या ज्वाळांवर संशोधन सुरू असून त्यात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांचा समावेश आहे. १६ जानेवारीला त्यातील सर्वात प्रखर ज्वाळा दिसली आहे. संपूर्णानंद दुर्बीण नैनीताल येथे आहे तेथून ही ज्वाळा स्पष्टपणे दिसली असून यातील माहितीच्या आधारे त्या कृष्णविवराचे वस्तुमान व इतर माहिती मिळू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 12:09 am

Web Title: discovery of light flames in the black hole abn 97
Next Stories
1 एप्रिलपासून रेल्वे पूर्वीप्रमाणेच धावणार?; ‘त्या’ वृत्तावर रेल्वे मंत्रालयाकडून खुलासा
2 माझ्यावर पाळत ठेवली जातेय; मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या तृणमूल खासदाराचा गौप्यस्फोट
3 “रिंकू शर्माच्या हत्येला अमित शाह जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा”
Just Now!
X