25 February 2021

News Flash

कृषिमंत्र्यांविना शेतकऱ्यांशी चर्चा

संघटनांच्या प्रतिनिधींचा बैठकीवर बहिष्कार

(संग्रहित छायाचित्र)

वादग्रस्त शेती कायद्यांबाबत शंकानिरसन करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बुधवारी कृषी भवनमध्ये झालेल्या बैठकीला ना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर उपस्थित होते ना त्यांचे दोन सहकारी राज्यमंत्री हजर होते. त्यामुळे संतापलेल्या २९ शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीवर बहिष्कार घातला.

याच मुद्दय़ावर मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व तोमर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यात, शेती व पणन क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यातील काही प्रतिनिधींनी केंद्राच्या या शेती कायद्यांचे स्वागत केले होते. बुधवारी प्रामुख्याने शेतकरी संघटनांशी चर्चा केली जाणार होती. त्या बैठकीला शेतीमंत्रीच नव्हे, तर एकही मंत्री उपस्थित नव्हता. ही बैठक कृषिसचिव संजय अगरवाल यांनी घेतली. चर्चेचे आमंत्रण दिले आता बैठकीला मंत्री आले नाहीत, हे केंद्राचे दुटप्पी धोरण असल्याची टीका समन्वय २९ शेतकी संघटनांच्या समन्वय समितीचे सदस्य दर्शन पाल यांनी केली.

शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी येणार असल्याने कृषी भवनाच्या परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवला होता. कृषिमंत्री आल्याशिवाय चर्चा होऊ  शकत नाही असे सांगत हे प्रतिनिधी बैठकीतून बाहेर पडले. कृषिभवनात त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली व नव्या शेती कायद्याच्या प्रती फाडल्या. कृषिसचिवांना निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. कृषिमंत्री नसलेल्या बैठकीत चर्चा करण्याचा काय उपयोग, असा सवाल या प्रतिनिधींनी केला.

पत्रकार परिषदेलाही अनुपस्थित

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेला कृषिमंत्री तोमर उपस्थित राहणार होते. मात्र, तिथेही ते आले नाहीत. तोमर निवडणूक प्रचारात असल्याचे सांगण्यात आले. नव्या शेती कायद्यांविरोधात प्रामुख्याने पंजाब व हरियाणात आंदोलन केले जात असून त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या राज्यांतील शेतकरी संघटनांशी चर्चा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:02 am

Web Title: discussions with farmers without the minister of agriculture abn 97
Next Stories
1 तिघांना करोनाचा पुन्हा संसर्ग?
2 चित्रकूटमध्ये ‘हाथरस’ची पुनरावृत्ती
3 तेलंगणात पावसाचे १९ बळी
Just Now!
X