News Flash

पंतप्रधानांची नाराजी

अफझल गुरू याच्या कुटुंबियांना त्याच्या फाशीची माहिती विलंबाने कळविण्यात आल्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. अफझल गुरू याला

| February 14, 2013 03:03 am

अफझल गुरू याच्या कुटुंबियांना त्याच्या फाशीची माहिती विलंबाने कळविण्यात आल्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. अफझल गुरू याला गेल्या शनिवारी फाशी देण्यात आले. फाशीच्या या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच त्याच्या कुटुंबियांना कळविणे आवश्यक होते, असे पंतप्रधानांनी शिंदे यांना स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी राष्ट्रपती भवनात राज्यपालांची परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान पंतप्रधानांनी शिंदे यांच्याकडे आपले हे मत व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 3:03 am

Web Title: displeasure of prime minister
Next Stories
1 नेत्यांच्या सुरक्षेसाठी किती खर्च केला? सर्वोच्च न्यायालयाने मागितली माहिती
2 गर्लफ्रेंन्डची हत्या केल्याबद्दल ‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसला अटक
3 मुंबई इंडियन्सचे प्रायोजकत्व हिरो मोटोकॉर्पकडून रद्द
Just Now!
X