सरन्यायाधीश आणि त्यांचे सहकारी न्यायाधीश यांच्यातील विश्वासाला पूर्णपणे तडा गेला आहे, त्यांच्यातील सुसंवादामध्ये अभाव आहे; परंतु सरन्यायाधीश हेच मास्टर ऑफ रोस्टर असतात ही वस्तुस्थिती आहे आणि ती बदलता येऊ शकत नाही, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांनी व्यक्त केले आहे.

आपण जवळपास ६७ वर्षे वकिली केली, परंतु असे कधीही घडले नव्हते, वकिलांची आणि न्यायाधीशांचीही सहिष्णुतेची पातळी घसरली आहे. पीठामध्ये

त्याचप्रमाणे न्यायालयामध्ये सहशासन वृत्ती आवश्यक आहे. आतापर्यंत न्यायाधीशांनी ती पाळली. आपण १९७२ मध्ये दिल्लीत आलो, तसेच ३२ सरन्यायाधीश पाहिले, मात्र असा प्रकार आपण कधीही पाहिला नाही, असे फली नरिमन यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

केशवानंद भारती निवाडय़ात १९७३ मध्ये म्हटले होते की, कोणतेही सरकार घटनेची मूलभूत रचना बदलू शकत नाही, मात्र सध्याचा तिढा सुटला नाही तर आपल्याला विनाशाचे साक्षीदार व्हावे लागेल, असा इशाराही नरिमन यांनी दिला आहे. केशवानंद भारती ही सुरुवात होती आणि आता आपल्याला अखेर दिसत आहे, असेही ते म्हणाले. सात न्यायाधीशांनी केशवानंद भारती यांच्या बाजूने मते दिली होती, असेही नरिमन म्हणाले.