छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे निधन झाले आहे. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिव्या यांनी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत गुलाबो ही भूमिका साकारली होती. दिव्या यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिव्या यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यांना गोरेगाव येथील एसआरवी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिव्या यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या ३४व्या वर्षी त्यांनी अखेर श्वास घेतला.
View this post on Instagram
अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिव्या यांच्या निधनाविषयी माहिती दिली आहे. ‘ज्यांच्या सोबत कोणी नसायचे त्यांच्यासोबत नेहमी तू असायचीस. दिव्या तू एकटी अशी होतीश जिला मी ओरडू शकत होते, जिच्यावर मी रागवू शकत होते, माझ्या मनातल्या गोष्टी सांगू शकत होऊ. तू खूप त्रासात होतीस. मला तुझी खूप आठवण येईल’ या आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने दिव्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 10:46 am